Ad will apear here
Next
भोंडला आणि दांडियात रंगले दिव्यांग विद्यार्थी
लायन्स क्लबच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : पारंपरिक पोशाख घालून मोठ्या उत्साहाने दांडिया खेळणारी, तितक्याच उत्साहाने ‘ऐलमा पैलमा.. , अशी गाणी म्हणत भोंडला खेळणारी दिव्यांग मुले सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. छान कपडे घालून, नटून-सजून आलेली ही मुले या खेळात अगदी रंगून गेली होती. निमित्त होते लायन्स क्लब ऑफ पूना वेस्ट व कोथरूडच्या वतीने आयोजित महाभोंडला व दांडिया कार्यक्रमाचे.


दिव्यांग विद्यार्थ्यांनादेखील या पारंपरिक सणांचा, खेळांचा  आनंद घेता यावा यासाठी दर वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाचे या उपक्रमाचे १० वे वर्ष होते. कामायनी संस्थेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात कामायनी, सेवासदन दिलासा केंद्र, शुभदा कार्यशाळा, ज. र. तरटे मुक्तशाळा, जीवनज्योत शेल्टर वर्कशॉप या संस्थांमधील २०० दिव्यांग विद्यार्थी सहभागी झाले होते. 


उत्कृष्ट वेशभूषा आणि दांडिया सादर करणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांना बक्षीसेही देण्यात आली. दांडियामध्ये शुभम पानसरे, गौरव वांजळे, अमन आल्हाट, प्रशांत रणदिवे यांनी, तर वेशभूषेसाठी मंथन खिलारे, आदेश पाथरकर, अमन शेख, प्रदीप कुशावह यांनी बक्षीसे मिळवली. विद्यार्थिनींमध्ये दांडियासाठी साक्षी धुमाळ, तनया बर्वे, श्वेता पुजारी, आरती पवार यांनी तर, वेशभूषेसाठी सुप्रिया गायकर, महालक्ष्मी अय्यर, चैत्राली पोटे, रिया गुजर यांनी बक्षीसे मिळवली. 


या वेळी मालती भामरे, अभय शास्त्री, श्रध्दा पेठे, रेश्मा माळवदे, श्रीलेखा कुलकर्णी, रितू नाईक, उपक्रम प्रमुख सीमा दाबके व अनुराधा शास्त्री, तसेच कामायनीचे संस्थेचे कालिदास सुपाते व सुजाता अंबे उपस्थित होते. पल्लवी देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZXHCF
Similar Posts
चिमुकल्यांनी केली पर्यावरणपूरक दिवाळीची तयारी पुणे : बावधनमधील गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी यंदा पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी स्वतःच आकर्षक कंदील, तोरणे आणि रंगीत पणत्या तयार केल्या. त्यांना या कामात पालकांनीही उत्साहाने मदत केली. रंगीबेरंगी कागद, खडू, माती यांच्या साह्याने मुलांनी सुंदर आकाशकंदील आणि नक्षीदार पणत्या बनवल्या
आदिवासी निर्मित पर्यावरणपूरक दिवे, कंदील यांचे प्रदर्शन पुणे : देशभरातील आदिवासी आणि ग्रामीण कलाकारांनी तयार केलेले पर्यावरणपूरक दिवे, आकाशकंदील, लामणदिवे, तसेच दिवाळीसाठी भेटवस्तू आणि गृह सजावटीच्या अनेक कलाकृतींचे प्रदर्शन ट्राईब छत्री कलादालनात भरविण्यात आले आहे.
‘ट्राइब’मधील विद्यार्थ्यांची दिव्यांग मुलांसोबत दिवाळी पुणे : दिवाळीचा सण हा आनंद देणारा आणि आयुष्यातील प्रकाश वाढवणारा सण म्हणून साजरा केला जातो. हाच आनंद ट्राइब स्टुडंट अकॉमोडेशनमधील विद्यार्थ्यांनी दिव्यांग मुलांसोबत वाटला. ‘दिवाली विथ अ कॉज’ म्हणून या विद्यार्थ्यांनी अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट येथील ७० दिव्यांग मुलांसोबत दिवाळीचा सण साजरा केला.
धनत्रयोदशीला दागिने खरेदीसाठी लोकांची गर्दी पुणे : दिवाळीचा उत्साह आता बाजारपेठेत जाणवू लागला आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर दागिने खरेदीसाठी लोकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language